आगामी गणेशोत्सवासाठी चिपळूणपर्यंत दिवा ते चिपळूण मार्गावर दि. 13 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
दिनांक 13 सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर 2023 या कालावधीत युवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत. दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल 01155/01156 गाडी दिवा येथून सात वाजून 45 मिनिटांनी सुटून चिपळूणला ती एक वाजून 25 मिनिटांनी पोहोचणार आहे.
चिपळूणला आलेली मेमू स्पेशल गाडी दुसऱ्या दिवशी दिनांक 14 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दुपारी १ वाजता सुटून रात्री सात वाजता ती दिवा जंक्शनला पोहोचेल. असे असतील दिवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीचे थांबे पनवेल, पेण
, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड तसेच अंजनी ही आठ डब्यांची गाडी असेल. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे नियमित तसेच विशेष गाड्यांचे कन्फर्म आरक्षण न मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*