Breaking News
रत्नागिरी : ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे भामटे गजाआड, साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश रत्नागिरी : हातखंबा येथे चार वाहनांची साखळी धडक; ट्रक क्लिनर गंभीर जखमी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प रत्नागिरी: कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या मंडणगड : बामणघरमध्ये जमीन घोटाळा, बाप लोकांनी जमिनीच्या मालकालाच लावला चुना, “पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा गैरवापर, 52 एकर जमीन लाटली, 41 लाखांचा घोटाळा उघड दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : सनगरे वाडीतील प्रौढाचा विहिरीत पडून मृत्यू

banner 468x60

हातखंबा-सनगरे वाडी येथील बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह आंब्याच्या बागेतील विहीरीत सापडला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र गोविंद सनगरे (वय ४०, रा. सनगरेवाडी, हातखंबा) असे मृत प्रौढाचे नाव आहे.

banner 728x90

ही घटना बुधवारी (ता. १४) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र सनगरे हे सोमवारी (ता. १२) जानेवारीपासून बेपत्ता झाले होते. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती.

नातेवाईक व पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असताना त्याचा भाऊ रवींद्र गोविंद सनगरे हा शोध घेत असताना रत्नागिरी ते निवळी रस्त्यावरील जांभोळकरीन मंदिर समोरील एका आंबा कलमांच्या बागेतील विहिरीत त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *