Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली : सौंदर्यात भर घालणाऱ्या 2 कोटींच्या बगीच्याचे काम अंतिम टप्प्यात

banner 468x60

दापोली शहराच्या सौंदर्यात भर घालणारा दोन कोटींचा विकास निधी खर्च करून एक बगीचा तयार करण्यात येत आहे. या बगीच्याचे काम अंतिम टफ्यात आले आहे.

banner 728x90 banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

दापोली शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्यानंतर आता दापोली शहराचे सौंदर्य खुलवणारा एक बगीचा तयार होत आहे.

शासनाच्या वैशिष्ट्ये पूर्ण कामांसाठी योजनेच्या अनुदानातून तब्बल दोन कोटी विकास निधीतून दापोली शहरातील आरक्षण क्रमांक 19 या बगीच्यासाठी राखीव असलेल्या 4376.80 चौरस मीटर एवढया क्षेत्रात बगीचा आकार घेत आहे.

या बगीच्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या बगीच्यामुळे दापोली शहराचे सौंदर्य अधिक खुलणार आहे. बगीच्यामध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली असून ओपन जिमचे साहित्यही बसविले गेले आहे.

चौथरे, विविध फुलांची लागवड, आकर्षक वनस्पती बरोबरच बगीच्यात फिरण्यास पाथवे, सोबतच महिला आणि पुरूषांसाठीची स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच विश्रांतीसाठी 20 बाकडे बसविण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जसा दापोली शहराच्या वैभवात भर घालतो आहे तसे आकार घेणारा बगीचा दापोलीच्या सौंदर्यात अधिक भर घालणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *