Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : एम.इ.एस.ए.एम. परशुराम हॉस्पिटलतर्फे महाआरोग्य शिबिर, विविध तपासण्यांवर मोठी सवलत

banner 468x60

घाणेखुंट – लोटे (ता. खेड) : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एम.इ.एस.ए.एम. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा १८ वा वर्धापन दिनानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. रुग्णांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले असून विविध तपासण्यांवर विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

तपासण्यांवर आकर्षक सवलती

या शिबिरात
•रक्त व लघवी तपासणीवर ५०%,
•थायरॉईड तपासणीवर ३०%,
•ECG आणि X-Ray तपासणीवर ५०% सवलत देण्यात आली आहे.

महिलांसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची (HPV टेस्ट) मोफत तपासणी ही विशेष सुविधा उपलब्ध असणार आहे.

विविध आजारांची मोफत तपासणी व उपचार मार्गदर्शन या शिबिरात सामान्य वैद्यकीय तपासणीसह खालील आजारांवरील तपासणी, मार्गदर्शन व आवश्यकतेनुसार औषधोपचार केले जाणार आहेत.

जसे की
•मधुमेह, उच्च रक्तदाब
•हृदयविकार व रक्तवाहिन्या विकार
•मूत्रपिंड व यकृताचे आजार
•श्वसनाचे विकार (COPD, दमा)
•पॅरालीसिस, फिट
•जीवनशैली विकार व लठ्ठपणा

आवश्यक रुग्णांसाठी 2D Echo वरही सवलतीची सुविधा उपलब्ध असेल.
शस्त्रक्रिया विभागाच्या सेवाही उपलब्ध
जनरल सर्जरी अंतर्गत
हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, भगंदर, फिशर, पोटाचे इतर आजार, गाठी, स्तनातील गाठी, मूतखडे, प्रोस्टेट अशा विकारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे.
क्षारसूत्र, अग्निकर्म, विध्दकर्म व जलौका उपचार यांचाही लाभ शिबिरात घेता येणार आहे. स्त्रीरोग, बालरोग व पंचकर्म विभागातून विशेष सेवा स्त्रीरोग विभागात
गर्भधारणेची योजना, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, पाळीचे त्रास, गर्भाशयाचे विकार, गर्भसंस्कार इत्यादींची तपासणी होणार आहे.

बालरोग विभागात निदान, उपचार, मार्गदर्शनासह सुवर्णप्राशन संस्कारही करण्यात येणार आहे.

पंचकर्म विभागातून
सांध्यांचे, मणक्याचे, पचनविकार, जीवनशैली विकार, त्वचा विकार व मानसिक ताणतणावावर प्रभावी पंचकर्म उपचारांची माहिती व तपासणी उपलब्ध असेल.
आयुर्वेद तज्ञांचे खास मार्गदर्शन

शिबिरात
•वैद्य सुविनय दामले (कुडाळ) – मधुमेह व त्वचा विकार
•वैद्य कीर्ती देव – सौंदर्य चिकित्सा व केसांचे विकार या तज्ञ वैद्य उपलब्ध राहणार असून रुग्णांना विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच योगोपचार सल्ला देखील देण्यात येणार आहे. नेत्र तपासणी व मोतीबिंदू उपचार
नेत्र विभागामार्फत मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व आवश्यक ती शस्त्रक्रिया उपचार यांची सुविधाही उपलब्ध असेल.

गरजू रुग्णांसाठी जनआरोग्य योजनांचा लाभ

शिबिरात येणाऱ्या गरजू रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व ESIC अंतर्गत मोफत उपचार मिळणार आहेत.
याशिवाय, शिबिरात नोंदणी केलेल्या सर्व रुग्णांना पुढील ३ महिन्यांपर्यंत २० ते ३०% सवलत देण्यात येणार आहे.
रुग्णांसाठी मोफत वाहतूक सुविधा
शिबिराच्या दिवशी तलारी फाटा (एक्सल) ते रुग्णालय आणि परत अशी प्रत्येक अर्ध्या तासाला गाडीची सोय करण्यात आली आहे. रुग्णांनी पूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट असल्यास सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क सुश्मिता पाटील – ७७७५९७२४४१
मंगेश शेठ – ९२७१६८६५४४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *