Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : प्रति महाबळेश्वर दापोलीचा पारा ८.५ अंश सेल्सिअसवर

banner 468x60

प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे दापोली शहर सध्या अक्षरशः गारठलं आहे. महाबळेश्वर, पाचगणीसारख्या थंड हिलस्टेशनप्रमाणे दापोलीचा पारा तब्बल ८.५ अंश सेल्सिअसवर घसरला आहे. या वर्षातील तापमानातील ही सर्वाधिक कमी नोंद ठरली आहे. एका बाजूला

किमान तापमान इतके खाली आले असताना, दुसरीकडे कमाल तापमान ३०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. यामुळे किमान आणि कमाल तापमानात तब्बल २२ अंशांची मोठी तफावत निर्माण झाली आहे. दिवसाच्या वेळी हलकी ऊब जाणवत असली तरी, सायंकाळपासून रात्री व पहाटे हवा थंडावा अंगावर काटा आणणारा ठरत आहे.

दापोलीत वाढलेली पर्यटकांची गर्दी, स्वच्छ आकाश आणि समुद्रकिनाऱ्याकडे वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात अचानक मोठी घट झाली असल्याचं हवामान विभागाचे म्हणणे आहे. या तीव्र थंडीमुळे दापोलीतील नागरिकांनी ऊबदार कपड्यांचा आधार घेतला असून, पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना या सुखद थंडीचा अनुभव घेता येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *