Breaking News
रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरीचा देशात डंका, देशात पटकावला तिसरा क्रमांक, स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीची दमदार कामगिरी रत्नागिरी : स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पती सुकांतसह नोकराचा जामीन अर्ज फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय, चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात चिपळूण : रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंग व्यवस्था करा, शौकतभाई मुकादम यांची मागणी मंडणगडच्या दोन शाळकरी मुलींची भरारी थेट अमेरिकेत! गोठे आणि वेसवीच्या अपेक्षा-मानस करणार अंतराळ संशोधन केंद्राला भेट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सातासमुद्रापार झेप संगमेश्वर : देवरुखजवळ बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, सोन्याचे दागिने आणि 1.70 लाखांची रोकड चोरी

चिपळूण : नगरपरिषद निवडणुकीत नसरीन खडस यांनी भरला उमेदवारी अर्ज

banner 468x60

चिपळूण नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीत एक विशेष लक्षवेधी घटना घडली, ती म्हणजे चिपळूणमधील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या नसरीन खडस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांनी चिपळूण नगरपरिषद वार्ड क्रमांक पाच मधून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच वार्ड क्रमांक पाचमधील कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नसरीन खडस यांची चिपळूण शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एक सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना मोठा

जनसमर्थन लाभत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल केल्याने वार्ड क्रमांक पाच मधील लढत आता अधिकच रंजक होणार आहे. त्यांना मिळणारा लोकांचा पाठिंबा पाहता, या निवडणुकीत त्या एक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *