मंडणगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

banner 468x60

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस व मंडणगड पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन म्हामुणकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत 12 नोव्हेंबर 2025 जामगे, खेड येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

banner 728x90 banner 728x90

या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य अण्णा कदम, सुधाकर म्हामुणकर, वहाब कुडूपकर, संदेश खांडेकर, अल्पेश भोसले, प्रवीण खांडेकर, संतोष साळवी, समीर म्हामुणकर, अरुण गायकवाड, सुभाष भोसले, संदीप सोंडकर, निलेश शेठ, पालघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी खांडेकर,. सुचिता म्हामुणकर, सपना साळवी, दीपिका भोसले मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनच्या विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात सक्रीय झालेले नितीन म्हामुणकर यांनी राजकारण व समाजकारणात आपल्या कर्तुत्वाने एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. सर्वांसाठी वेळेला मदतीसाठी धावून येणारा नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेत असतानाच राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रभावित असल्याने राज ठाकरे यांनी मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी मनसे मध्ये पक्षप्रवेश केला.

त्यावेळी त्यांची मनसेचे मंडणगड तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. स्थानिक पातळीवरील बदलत्या राजकारणात 2017 साली ते राष्ट्रवादीतून पंचायत समितीची निवडणूक लढवून विजयी झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या पंचायत समिती गाणासह तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहिले. विकासकामांसाठी स्थानीक स्वराज संस्थांचे निवडणुकांचे पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात असून माजी आमदार संजय कदम यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते असलेल्या.

म्हामुणकर संजय कदम यांच्याबरोबर प्रथम शिवसेनेत व नंतर शिवसेनेत न जाता वेट अँण्ड वॉच भूमीका कायम त्यांनी ठेवली. उत्तम प्रशासकीय जाण असल्याने तालुक्याच्या राजकारणाचा विचार करता त्यांचा पक्षप्रवेश राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यांच्या पक्षप्रवेशाने निवडणुकांच्या गणितावरही मोठा प्रभाव पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *