Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

चिपळूण : भरधाव कार थेट घुसली दुकानात

banner 468x60

चिपळूण : भरधाव कार थेट घुसली दुकानात

शहरातील मार्कंडी येथील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या फॅमिली स्टोअर्स या दुकानात वेगाने आलेली कार घुसली.

banner 728x90 banner 728x90

या घटनेत दुकानासह कारचे मोठं नुकसान झालं असून, एक तरुण जखमी झाला आहे. शहरातील बहादूर शेख नाक्याहून चिंच नाक्याकडे वॅगनर कार घेऊन येत असताना हा अपघात घडला.

कार चालकाचा ताबा सुटल्याने तो विरुद्ध बाजूला गेला. त्यानंतर मार्कंडी येथे चौकातील फॅमिली स्टोअर्सकडे गाडी अचानक वळली. त्यानंतरही गाडीवर नियंत्रण न राहिल्याने गाडी थेट दुकानातच घुसली.

यामध्ये दुकानातील फर्निचर व दर्शनी भागातील मालाचे नुकसान झाले. तसेच दुकानासमोर उभ्या असलेल्या एका तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

त्याला तत्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. तसेच अपघातग्रस्त कारचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर मार्कंडी चौक परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *