Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : घरात आलेल्या बिबट्यापासून 65 वर्षीय वृद्धाने वाचवले अख्खे कुटुंब

Screenshot

banner 468x60

बिबट्याच्या रूपात काळ समोर आला होता; पण ६५ वर्षीय वृद्धाने प्रसंगावधान राखले आणि आपल्या ९५ वर्षांच्या वडिलांसह घरातील सर्वांचे प्राण वाचवले. काळजाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडीत. अशोक गंगाराम रवंदे यांनी घरात घुसलेल्या बिबट्याच्या तावडीतून अख्खे कुटुंब वाचवले आहे.

banner 728x90 banner 728x90

किरबेट ओझरवाडीत राहणारे अशोक रवंदे बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घराबाहेर गेले. नेमका त्याचवेळी कुत्र्याच्या शिकारीसाठी बिबट्या घरात शिरला. रवंदे पुन्हा घरात आले आणि त्यांनी दरवाजा बंद केला. मात्र, घरातील कुत्र्याचा आवाज आल्याने त्यांनी घरातील दिवे सुरू केले. त्यावेळी बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

मात्र, घराचे सर्व दरवाजे बंद असल्याने बिबट्याला घरातून बाहेर पडता येत नव्हते. त्यावेळी घरात अशोक रवंदे यांचे ९५ वर्षांचे वडील गंगाराम सीताराम रवंदे, सुंदराबाई रामचंद्र रवंदे (वय ६०), अशोक यांची पत्नी शेवंती रवंदे (वय ५५), अशी माणसे होती. यावेळी काय करायचे ते कोणालाच सूचत नव्हते.

हा सारा प्रकार अर्धा तास सुरू होता. बिबट्याने कुत्र्याला पकडले होते. अशोक रवंदे यांनी धाडस करून दरवाजापर्यंत गेले. त्यांनी दरवाजा उघडला आणि ते पाहून बिबट्याने तेथून धूम ठोकली. अशोक यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबतची माहिती पोलिस पाटील प्रदीप अडबल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन रवंदे यांच्या कुटुंबाची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *