Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

मंडणगड : गाडीला कट मारला, शिवसेना पदाधिकाऱ्यांची दादागीरी

banner 468x60

गाडीला कट मारल्याच्या रागातून दापोली येथील चाैघांनी डंपर चालकाला बेदम चोप दिल्याची घटना रविवारी (२८ मे) सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान दहागाव (ता. मंडणगड) येथे घडली.


यामध्ये डंपर चालक जखमी झाला असून, मंडणगड पाेलिस स्थानकात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करणारे चौघेही शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असल्याचे समाेर आले आहे.

banner 728x90 banner 728x90

डंपर चालक विनोद खानविलकर (रा. केळवत, ता. मंडणगड) यांनी फिर्याद दिली आहे.


त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, सुधीर कालेकर व सचिन जाधव यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विनाेद खानविलकर हे डंपर (एमएच ०८, बीबी ७४४४) घेऊन कुंबळे ते चिंचाळी असे जात होते.


कुंबळे ते दुधेरे गावादरम्यान समोरून दापोलीच्या दिशेने लाल रंगाची गाडी येत होती. या गाडीचे चाक रस्त्याच्या कडेला गेल्याने खानविलकर यांनी डंपर सरळ करून चिंचाळीकडे निघाले.


त्यानंतर दहागाव येथील गतिरोधकाजवळ डंपरसमोर कार आडवी लावली व यातील भगवान घाडगे यांनी चालक खानविलकर यांना माझ्या गाडीला हूल का दिलीस,
असे म्हणून गाडीतून खाली खेचून डंपरमधील लोखंडी राॅडने मारहाण केली,

तसेच त्यांच्यासोबत असणारे सुधीर कालेकर, प्रदीप सुर्वे व सचिन जाधव यांनीही मारहाण केली.


यावेळी खानविलकर यांच्या डोक्यामध्ये दगड मारण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत डंपरची काच फोडून डंपरचे नुकसान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *