Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

खेड : कुरवळ जावळी येथे लग्नाच्या वरातीमध्ये मारहाण 5 जण जखमी, 11 जणांवर गुन्हा

banner 468x60

लग्नाची निघालेल्या वरातीमध्ये ११ जणांच्या समूहाने लाठी काठीने केलेल्या मारहाणीत एका महिलेसह ४ जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कुरवळ जावळी आखाडेवाडी येथे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव काशिनाथ उतेकर, सुरज सुरेश उतेकर, अविनाश कृष्णा बामणे, सिद्धेश एकनाथ उतेकर, प्रथमेश प्रमोद उतेकर, प्रणय प्रमोद उतेकर, ओंकार संतोष उतेकर, प्रमोद तुकाराम उतेकर, निलेश देवजी उतेकर, अमोल दिलीप सावंत, अमित दिलीप सावंत, सर्व राहणार कुरवळ जावळी आखाडेवाडी अशी त्या गुन्हा दाखल झालेल्या ११ जणांची नावे आहेतगावातील दीपक उतेकर यांच्या लग्नाची वरात मंगळवारी निघाली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वरील संशयित हातात काठी घेऊन वरातीवर हल्ला केला.

यामध्ये शितल उतेकर या महिलेच्या कानातील कर्णपुरे जमिनीवर पडली. तसेच अंकुश मोरे यांच्या गाडीचे नुकसान केले या माराहणीमध्ये समीर चंद्रकांत उतेकर, शिवाजी चंद्रकांत उतेकर, शितल शिवाजी उतेकर, सुरेश गणपत उतेकर, बाबाजी शंकर उतेकर, (सर्व राहणार कोरबळ जावळी आखाडेवाडी) हे ५ जण जखमी झाले. याप्रकरणी ११ जणांवर भादविक १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *