Breaking News
खेड : कायदा-सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्याचा खरा सन्मान, मंत्री योगेश कदम यांचं संबोधन, खेड तहसील कार्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात दापोली : कोकण कृषी विद्यापीठाच्याविद्यार्थिनी पंचनदीत ‘मिशन आंबा’! प्रत्यक्ष छाटणी प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना आधुनिक बाग व्यवस्थापनाचे धडे दापोली : दाभोळ -दापोली रोडवर मारहाण, ‘हॉटेल येथे बार सुरू आहे का?’ विचारल्यानंतर राडा, जॅकच्या रॉडने डोक्यात मारल्याचा आरोप, तिघांविरोधात गुन्हा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेतील धोकादायक खड्ड्याची अखेर कायमस्वरूपी दुरुस्ती गुहागर : उमराठ ग्रामपंचायतीत माजी सैनिक दीपक जालगांवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गुहागर : 7 गावांमध्ये पाणी टंचाई

banner 468x60

एप्रिलच्या सुरूवातीला पाणी टंचाईची झळ तालुक्यातील 7 गावांना जाणवू लागली असून त्यांनी टँकरची मागणी केली आहे. यातील तीन गावांना ग्रामपंचायतीमार्फत टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये 8 गावांमधील 8 वाड्यांना यावर्षी पाणी टंचाई जाणवेल, असे प्रशासनाने म्हटले आहे. यामध्ये आंबेरे खुर्द, झोंबडी, काताळे, धोपावे, पाचेरीसडा आणि गोळेवाडी या गावांचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात आराखड्यामधील धोपावे गावाने टँकरची मागणी केली आहे. परंतु या आराखड्याबाहेरील 6 गावांमध्ये जानेवारीपासूनच टंचाई जाणवत आहे. यामुळे आराखड्यामधील गावे धरून यावर्षी टंचाईग्रस्त गावांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होणार आहे. तालुक्यातील वेलदूर व रानवी या दोन गावांत जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर ग्रामपंचायतींनीच ग्रामनिधीतून आपल्या गावातील वाड्यांना एक दिवस आड टँकरने पाणी पुरवठा केला. त्यानंतर अंजनवेल गावातील कातळवाडी व सुतारवाडीला टंचाई जाणवू लागली आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या 19 तारखेपासून आरजीपीपीएलने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *