Breaking News
दापोली : दापोलीत मोठा जमीन घोटाळा? वक्फ जमिनींच्या व्यवहारांना वक्फ मंडळाची नोटीस, जमिनींच्या व्यवहारांचा पर्दाफाश होणार? एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कनेक्शनमुळे प्रकरण चर्चेत, 44 जणांना नोटीस, 7 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

खेड : खाद्यपदार्थातून विषबाधा झाल्याने तरुणीचा मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील सवणस-रांगळेवाडी येथील रहिवासी आणि सध्या मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा खाद्यपदार्थ खाल्ल्याने झालेल्या विषबाधेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या हृदयद्रावक घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता १२वीपर्यंत शिक्षण घेतलेली तरुणी काही दिवसांपूर्वीच नोकरीच्या निमित्ताने घाटकोपर-मुंबई येथे आली होती. १३ जुलै रोजी तिने खाद्यपदार्थांचे सेवन केले.

त्यानंतर तिला सलग दोन दिवस उलट्यांचा त्रास आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला.


निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास सवणस येथील नजीकच्या स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *