राजापूर तालुक्यातील बारसू येथे झालेल्या रिफायनरीविरोधी आंदोलनात महिला आंदोलकांनी महिला पोलिसांच्या हातातील लाठ्या हिसकावून घेतल्या. एवढचं नव्हे तर त्यांच्या हाताला चावे घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आंदोलनकर्त्यांच्या अंगावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पोस्टर्स लावून या महिला आंदोलनात उतरल्याची माहितीही आता पुढे आली आहे. आंदोलनादरम्यान उपविभागिय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांच्यासह सहा महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. इतेकच नाही तर आंदोलकांनी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला. काही ठिकाणी त्यांनी गवतालाही आग लावून दिली. सुदैव त्यात कोणी आंदोलक अथवा पोलीस कर्मचारी जखमी झाला नाही. आंदोलनावेळी फक्त एका बाजूचे व्हिडिओ समोर आणले जात होते. मात्र आता पोलिसांनी केलेल्या दाव्यातून आंदोलनातील धक्कादायक वास्तव आणि आंदोलकांचा आक्रमकपणा समोर आला आहे. बारसू येथे शुक्रवारी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केला आणि आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले, अशी माहिती दिली गेली. त्यावर मोठे राजकारणही केले गेले. मात्र, आंदोलकांनी पोलिसांसोबत केलेलं वर्तन अत्यंत धक्कादायक होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. आंदोलन होऊ शकते, याची दखल घेऊन पोलिसांनी यावेळी अतिशय मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात ठेवला होता. मात्र आंदोलकांनी पोलिसांच्या या बंदोबस्ताला उत्तर देण्यासाठी नियोजन केले असल्याची माहिती पुढे आली आहे. आंदोलनात सर्व ग्रामस्थ एकाचवेळी उतरले नाहीत. एक एक फळी आंदोलनात येत होती. त्यामुळे पोलिसांना एकाचवेळी कारवाई करता येत नव्हती. ज्यावेळी महिला आंदोलक प्रतिबंधित क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा महिला पोलिसांनी आपल्या हातातील लाठ्या आडव्या धरुन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी महिला पोलिसांच्या हातातील लाठ्या घेण्यापासून ते महिला पोलिसांच्या हाताला चावे घेतल्याचा
राजापूर : आंदोलक महिला हाताला चावल्या, सहा महिला पोलीस कर्मचारी जखमी
Read Also
Recommendation for You

रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या २० वर्षीय नेपाळी तरुणाचा उपचारापूर्वीच…

दापोली शहरातील दापोली शिक्षण संस्था संचालित ए. जी. हायस्कूलच्या १४ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने जिल्हास्तरीय…

हॉटेलमध्ये काम करत असताना जिन्यावरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ४५ वर्षीय कामगाराचा मुंबईतील…

दापोली शहरातील नवानगर येथे ७९ वर्षीय वृद्धाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी…









