गुहागर : गाडी वळवण्यावरून वाद लोणावळ्यात गेलेल्या गुहागरमधील तरुणाचा खून

banner 468x60

लोणावळ्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या गुहागरमधील एका तरुणाचा वाहन वळवण्यावरून झालेल्या वादामुळे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार, २५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

banner 728x90 banner 728x90

कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. अडुर, कोंडकारुल, गुहागर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत अन्य दोघे जखमी झाले असून, या खून प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गुहागरमधून कमलेश धोपावकर हे लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. लोणावळ्याजवळील एका फार्म हाऊसजवळ गाडी वळवत असताना स्थानिक तरुणांच्या टोळक्याने त्यांच्याशी हुज्जत घातली.

या हुज्जतीचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि याच मारामारीतून कमलेश धोपावकर यांचा खून करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दोन स्थानिक तरुणांना ताब्यात घेतले असून, अन्य नऊ जण फरार आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *