Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : लोकमान्य हायस्कूल दापोली प्रशालेचा एसएससी मार्च 2025 निकाल 100%

Screenshot

banner 468x60

लोकमान्य हायस्कूल दापोली प्रशालेचा एसएससी मार्च 2025 निकाल 100% लागला असून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान कुमारी सानिका अनिल पवार हिने ८५% गुण मिळवून पटकावला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

banner 728x90 banner 728x90


दापोली शहरातील काळकाई कोंड येथील लोकमान्य हायस्कूल दापोली या प्रशालेतील एसएससी मार्च 2025 या परीक्षेला एकूण 32 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यातील सर्व 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेतून प्रथम क्रमांकाचा मान कुमारी सानिका अनिल पवार 85% हीने मिळवला आहे तर द्वितीय क्रमांक कुमारी कशीश कैलास कदम हिने 77 % गुण मिळवून पटकावला आहे प्रशालेतून तृतीय क्रमांकाने कुमारी मानसी अनिल मोहिते ही 71.80% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली आहे.


सदर तीनही विद्यार्थिनी ह्या गरिबीवर मात करून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या आहेत सदर परीक्षेमध्ये प्रशालेतून डिस्टिंक्शन मध्ये तीन विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये पंधरा विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मध्ये सात विद्यार्थी आणि पास श्रेणीमध्ये सात विद्यार्थी यशस्वी झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लोकमान्य सेवाभावी प्रतिष्ठान कराड दापोली संचलित लोकमान्य हायस्कूल दापोलीचे अध्यक्ष धनंजय खोत सचिव वर्धमान खोत मुख्याध्यापिका काजल राऊत सहाय्यक शिक्षकांनी वानखडे सेजल भाटकर अभिनय खोत विजय महाले सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *