Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : तांबी धरणात काल बुडालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

banner 468x60

चिपळूणमध्ये काल तांबी धरणात काल बुडालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. चिपळूण तालुक्यातील तांबी धरणात एका 27 वर्षीय तरुण धरणात बुडल्याची घटना काल घडली होती.

रामपूर-तांबी धरणात गुरे धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रतिक अजय लटके (३०, भालघर) असे त्याचे नाव आहे. गुढीपाडव्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक हा रविवारी तांबी धरणात नेहमीप्रमाणे गुरे धुण्यासाठी गेला होता. यावेळी बैलाला बांधलेली दोरी सुटल्याने त्याचा तोल गेला व तो पाण्यात बुडाला. याचीं माहिती मिळताच ग्रामस्थांनी येथे धाव घेतली.

त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्याचा धरणात शोध घेण्यासाठी नगर परिषदेकडे बोट मागण्यात आली.

त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी बोट चालक शौकत गोलंदाज, नगर परिषदेचे कर्मचारी जयंत कासार आदींना यंत्रणा घेऊन पाठवले.

त्यानुसार शोध घेण्यात आला असता सायंकाळी प्रतिक याचा मृतदेह सापडला असून याची पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *