Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दाभोळ : येथे छातीत दुखू लागल्याने उपचारादरम्यान 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

banner 468x60

दाभोळ : छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेख अब्दुल रशीद शेख अमीर (वय ६२, मूळ रा. आलमगीर कॉलनी, बालेपीर रोड, बीड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, शेख अब्दुल रशीद यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना प्रथम दाभोळ येथील डॉ. केतकर यांच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र, उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.


या प्रकरणी दि. २४ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. घटनेची पुढील कार्यवाही संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *