खेड : गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारापूर्वीच 49 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील महाड नाका परिसरातील ४९ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस माहितीनुसार, रोहन (नानू) कुसुमाकर चिखले (वय ४९, रा. महाड नाका, खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी २६ जून २०२६ रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये फॅनला कापडी शॉलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचारासाठी नेले. मात्र, दुपारी १२.२९ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची आकस्मिक मृत्यू क्रमांक ५२/२०२६ अशी नोंद २६ जून रोजी दुपारी १.५७ वाजता खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *