राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ येथील ३५ वर्षीय प्रितम दिलीप शेट्ये यांचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम शेट्ये यांना २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी असताना रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर शेजारी राहणारे सतिश रावजी करगुंटकर यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर प्रकृतीची अधिक काळजी घेण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. रात्री सुमारे १० वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होते.
मात्र, उपचार सुरू असतानाच २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३१ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रितम दिलीप शेट्ये यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची नोंद नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २६/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













