रत्नागिरी तालुक्यातील कशेळी कोंड येथे ३९ वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. प्रशांत शंकर ताम्हणकर (वय ३९, रा. कशेळी कोंड, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत ताम्हणकर हे सकाळी सुमारे ७ वाजता उठल्यानंतर चहा पिऊन घरी बसले होते. त्यानंतर काही वेळाने ते पुन्हा झोपले. सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांचे भाऊ महेंद्र महादेव ताम्हणकर हे त्यांना उठवण्यासाठी गेले असता प्रशांत हे कोणतीही हालचाल करत नसल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाली येथे नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रशांत ताम्हणकर यांना दुपारी ३.३५ वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८८/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













