Breaking News
चिपळूण : सावर्डेत कंटेनरचे सील तोडून औषधांचे बॉक्स लंपास, 1.64 लाखांचा माल चोरीला रत्नागिरी : पोलिसांच्या 18 QRT जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण, सागरी सुरक्षेसाठी कौशल्यवृद्धी, भाट्ये समुद्रकिनारी सात दिवसांचे प्रशिक्षण शिबिर गुहागरच्या तळवलीत बिबट्याची दहशत, शिगवणवाडीत पाळीव कुत्र्यांना बनवले भक्ष्य, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू

खेड : दुचाकी अपघातात तरुण जखमी

banner 468x60

मुंबई–गोवा महामार्गावरील मोरवंडे परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकी अपघाताची घटना घडली. या अपघातात साहिल मेहता (वय २८, रा. खेड–महाड नाका) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी तत्काळ मदत करत जखमी साहिल यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार साहिल मेहता हे आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच ०८ एबी ६८६६) घेऊन लोटे येथून खेडच्या दिशेने येत होते. यावेळी अचानक रस्त्यावर जनावरे आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *