रत्नागिरी : खेडशी येथे तरुणाची आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. समीर अशोक पवार (वय ४२, रा. खेडशी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर पवार हा मागील काही महिन्यांपासून कौटुंबिक कारणांमुळे मानसिक तणावात होता. शुक्रवारी सकाळी त्याने आपल्या घरातील बेडरूममध्ये सिलिंग पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *