मंडणगडमध्ये विषारी फळ खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील तिडे-निमदेवाडी येथील ६५ वर्षीय महिलेचा विषारी फळ खाल्ल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
लक्ष्मी पांडुरंग निमदे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी जंगलातील ‘रामानंद’ नावाचे विषारी फळ खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी त्यांना उपचारासाठी मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मंडणगड येथे १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार रात्री सुमारे ८.१५ वाजता त्यांना रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होते.

दरम्यान, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री २.११ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद मंडणगड पोलिस ठाण्यात अ.मृ. क्र. १९/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. मृत महिलेचे वारस म्हणून प्रकाश पांडुरंग निमदे यांनी खबर दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *