Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

रत्नागिरी : प्रभाग 10 ची निवडणूक स्थगित, कारण काय पाहा

banner 468x60

नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याप्रकरणात अपिलाचे निकाल उशिराने लागल्याने रत्नागिरी नगर पालिकेतील प्रभाग 10 ची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. ही निवडणूक आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग दहामध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिंदे व संपदा रसाळ-राणा यांचा उमेदवारी अर्ज हा प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या रचनेनुसार नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता. त्याविरोधात दोन्ही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केली होती.

हे अपिल जिल्हा न्यायालयात 24 नोव्हेंबर रोजी फेटाळण्यात आले होते.
त्यामुळे 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर आलेल्या निकालांमुळे या सदस्यपदांच्या निवडणुका 4 नोव्हेंबरच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेऊ नयेत व ही निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रभाग 10 व्यतिरिक्त अन्य प्रभागांची निवडणूक यापूर्वी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रभाग 10साठी त्यामुळे नवीन कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख 10 डिसेंबर दु.3 वाजेपर्यत आहे. आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह देऊन, अंतिम लढवणाऱ्या निवडणूक उमेदवारांची यादी 11 डिसेंबर रोजी प्रसिध्द करायची असून 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30पर्यत मतदान होणार आहे तर मतमोजणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. करायची आहे. 4 डिसेंबरपासून प्रभागापुरती आचारसंहिता लागू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *