रत्नागिरी : कारमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेल्यावैभव सावंतदेसाई यांचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी शहरानजीकच्या एकदंतनगरकडे जाणाऱ्या फाट्याजवळ कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडून आलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार २ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. वैभव जयप्रकाश सावंतदेसाई (४३, रा. नवेदरवाडी खेडशी, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार, सोमवारी दुपारी एकदंतनगर फाट्याजवळ इर्टीगा कार (एमएच-०८ -एएन-८९०४) उभी होती. तसेच कारला बाष्प पकडले होते. खबर देणार यांनी कारमध्ये पाहिले असता त्यांना कारमध्ये ड्रायव्हरसीट मागे घेऊन वैभव सावंतदेसाई झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे खबर देणार यांनी त्याठिकाणी जमलेल्या इतर लोकांच्या मदतीने गाडीची काच फोडून दरवाजा उघडला असता वैभव सावंतदेसाई यांची कोणतीच हालचाल दिसून येत नव्हती.

तसेच त्यांच्या तोंडातून फेस आलेला होता. खबर देणार यांनी त्याच कारमधून वैभवला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *