Breaking News
दाभोळ अत्याचार प्रकरण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित आरोपीला 13 जुलैपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी ​दापोलीत धक्कादायक प्रकार 7 वर्षांच्या चिमुरडीवर हॉटेलच्या किचनमध्ये अत्याचार, 50 वर्षीय नराधम किशोर पटेल विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल मंडणगड : आंबेत खाडीतील अडकलेल्या दोन्ही बार्ज हटवण्यात यश, म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना

महाड : गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! खासगी क्लासच्या शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य

banner 468x60

समाजात गुरु-शिष्याचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. मात्र, रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाडमध्ये (Mahad) या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका नामांकित खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

(Raigad Crime News)याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना महाड येथील ‘गांधी क्लासेस’ मध्ये घडली आहे. या प्रकरणातील पीडित मुलगा सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. क्लासेसचा मालक आणि शिक्षक सुनील गांधी याने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक सुनील गांधी हा शिकवणीच्या बहाण्याने मुलाच्या गुप्तांगाला स्पर्श करणे आणि अश्लील चाळे करत असे. इतकेच नव्हे तर, क्लासच्या वरच्या मजल्यावर असलेल्या स्वतःच्या बेडरुममध्ये नेऊन त्याने विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक आणि अश्लील कृत्य केल्याचेही समोर आले आहे. या सलग होत असलेल्या त्रासामुळे पीडित मुलगा प्रचंड मानसिक तणावाखाली होता. अखेर त्याने धाडस करून हा सर्व प्रकार समोर आणला.

या प्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून महाड शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आहे. आरोपी शिक्षक सुनील गांधी याच्या विरोधात ‘बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण’ (POCSO Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकासारख्या जबाबदार
महाड शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीने अशा प्रकारे इतरही कोणत्या विद्यार्थ्यांची फसवणूक किंवा छळ केला आहे का? याचा शोध घेतला जात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या घटनेने रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
शिक्षकासारख्या जबाबदार
महाड शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीने अशा प्रकारे इतरही कोणत्या विद्यार्थ्यांची फसवणूक किंवा छळ केला आहे का? याचा शोध घेतला जात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या घटनेने रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *