Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : हॅलोजन बदलताना विजेचा धक्का, देउड येथील 19 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील देउड येथे घराशेजारील लाईटचा हॅलोजन बदलत असताना विजेचा तीव्र धक्का बसून १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ९ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

मृत युवकाचे नाव जयराज संजय देसाई (वय १९, रा. देउड, ता. रत्नागिरी) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयराज देसाई हा आपल्या घराच्या शेजारी असलेल्या गाडीच्या शेडजवळील चालू वीजवाहिनीवरील हॅलोजन लाईट बदलण्याचे काम करत होता. यावेळी अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. धक्क्यामुळे तो खाली कोसळून बेशुद्ध झाला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला तातडीने जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सायंकाळी ४.३५ वाजता त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे देउड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जयराजच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *