मंडणगड : दारूबंदी कायद्यांतर्गत चार कारवाया, हातभट्टीसह देशी दारू जप्त

banner 468x60

मंडणगड तालुक्यात २८ ऑगस्ट रोजी दारूबंदी कायद्यांतर्गत पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तीसह विनापरवाना हातभट्टीची व देशी दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

मंडणगड येथील छकुली देशी दारू दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर दुपारी २.१५ वाजता संदिप सखाराम केंद्रे (वय २६, रा. घोसाळे, मंडणगड) हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९९/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोहेकॉ सुहास सुरेश मांडवकर यांनी फिर्याद दिल्यानंतर करण्यात आली.

दुसऱ्या कारवाईत बाणकोट सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेसवी धबधब्याजवळ चिंचेच्या झाडाखाली त्रिशुल लक्ष्मण जोशी (वय ४४, रा. वाल्मिकी नगर, मंडणगड) हा विनापरवाना हातभट्टीची दारू बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू व कॅन असा एकूण ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा रजि. नं. २६/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रामराव पवार यांनी फिर्याद दिली.

तिसऱ्या कारवाईत घराडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेतजमिनीतील गुरांच्या गोठ्याच्या आडोशाला अनंत गणपत कंक (वय ७०, रा. घराडी गावठाण, मंडणगड) हा विनापरवाना देशी दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून १८० मिली क्षमतेच्या जी.एम. संत्रा दारूच्या ९३ बाटल्या, एकूण किंमत ७,४४० रुपये, जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हा रजि. नं. १००/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल विनय रमेश पाटील यांनी फिर्याद दिली.

या तीन कारवायांमध्ये पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, विनापरवाना हातभट्टीची दारू बाळगणे तसेच देशी दारू विक्रीच्या उद्देशाने साठवणे अशा प्रकारांवर कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *