Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दाभोळमध्ये व्यापारी संघटनांचा बाजारपेठ बंदचा निर्णय, अजित पवार यांच्या निधनामुळे आदरांजली

banner 468x60

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे आज (28 जानेवारी) सकाळी बारामती विमानतळावर भीषण अपघातात निधन झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Baramati Plane Crash) झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.


विमानाचा अपघात झाल्यानंतर जमिनीवर कोसळल्यानंतर अक्षरश: कोळसा झाला. त्यामुळे या भयावह अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. दाभोळ व्यापारी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे.

दाभोळमधील बाजारपेठ आज दुपारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी संघटनांनी हा निर्णय एकमताने घेतला असून, यामागे शोक व्यक्त करणे व भावनिक संवेदनशीलतेची भूमिका असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सर्व व्यापारी बांधवांना या बंदमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


दाभोळमधील बाजारपेठ आज दुपारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी संघटनांनी हा निर्णय एकमताने घेतला असून, यामागे शोक व्यक्त करणे व भावनिक संवेदनशीलतेची भूमिका असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सर्व व्यापारी बांधवांना या बंदमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *