चिपळूण : पिंपळी येथे तरुणीला मारहाण आणि शिवीगाळ, आदीत्य पवार विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, तरुणीच्या आईलाही शिवीगाळ

banner 468x60

चिपळूण येथील पिंपळी येथे एका तरुणीला मारहाण करून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आदीत्य जालींदर पवार (रा. पिंपळी, चिपळूण) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 115(2), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबतची तक्रार 19 वर्षीय मुलीने दिली आहे. तक्रारदार आणि संशयित आदीत्य जालींदर पवार हे एकमेकांचे परिचित असून तक्रारदार काही काळ संशयिताच्या घरी वास्तव्यास होती. दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास, पिंपळी खुर्द येथे क्षुल्लक कारणावरून संशयित आदीत्य जालींदर पवार याने तक्रारदारास हाताने मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याचवेळी तक्रारदाराची आई हिलाही शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या तक्रारीच्या आधारे चिपळूण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गु.र.नं. 49/2026 दाखल करण्यात आला असून पुढील प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी हे प्रकरण पोलीस नाईक महाडीक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

या प्रकरणाची नोंद 29 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली आहे. दरम्यान चिपळूण पोलीस याबाबतचा सविस्तर तपास करत आहे. चिपळूण पोलीस आदित्य पवार विरोधात काय ठोस कारवाई करणार याकडे कुटुंबाचं लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *