चिपळूण : गांजाचे सेवन करताना तरुणाला रंगेहाथ पकडले; NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे वाशिष्ठी नदीच्या किनारी गांजाचे सेवन करत असलेल्या एका तरुणाला चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. २६ डिसेंबर) रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

हरीश तारानाथ पवार (वय ३५, रा. दातेवाडी, मराठी शाळेसमोर, खेर्डी, ता. चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रोशन शंकर पवार यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबस्ते येथील क्रेशरजवळ वाशिष्ठी नदीच्या किनारी सार्वजनिक ठिकाणी बसून हरीश पवार हा बेकायदेशीररित्या गांजासारख्या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत कलम ८ (क) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *