दापोली तालुक्यातील मुरुड येथील भैरीचा कोंड परिसरातील तलावात बुडून प्रसाद अनंत बांद्रे (वय २७, रा. मुरुड, भैरीचा कोंड, ता. दापोली) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तलावाच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रसाद बांद्रे हे मुंबईला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले होते. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी सकाळी मुरुड येथील भैरीचा कोंड परिसरातील तलावात तो मृतावस्थेत आढळला. तलावाच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.५६ वाजता आकस्मिक मृत्यू क्रमांक ७५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.
या तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. घटनेबाबत पुढील तपासाची माहिती मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













