राज्यावर संकट कायम! पाऊस पुन्हा कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

banner 468x60

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच राज्यातील काही भागात कडाक्याची उष्णता आहे तर काही ठिकाणी पाऊस सुरू आहे.

मराठवाड्यासह काही भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस कोसळताना दिसत आहे. पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून हाताशी आलेले पिक गेले. सरकारकडून सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस कायम राहणार आहे. मार्च महिना संपत आला आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, सोलापूर, सांगली या भागात आज वादळीऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

सोमवारपासून पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. कोकणात आज उष्णता अधिक वाढण्याचे संकेत आहेत. आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा मोठा इशारा देण्यात आला. दुपारी 12 ते 4 पारा वाढले. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील हवामानात सतत चढउतार बघायला मिळेल.

पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर चांदवड शहरासह ग्रामीण भागात आज अवकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून विजाचा कडकडात आणि मेघगर्जना करत सुमारे तासभर पावसाने झोडपून काढले. पावसाचा फटका काढणीला आलेला गहू, हरभरा आणि काढून ठेवलेल्या कांद्याला बसून मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *