Breaking News
चिपळूण : सावर्डेत कंटेनरचे सील तोडून औषधांचे बॉक्स लंपास, 1.64 लाखांचा माल चोरीला रत्नागिरी : पोलिसांच्या 18 QRT जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण, सागरी सुरक्षेसाठी कौशल्यवृद्धी, भाट्ये समुद्रकिनारी सात दिवसांचे प्रशिक्षण शिबिर गुहागरच्या तळवलीत बिबट्याची दहशत, शिगवणवाडीत पाळीव कुत्र्यांना बनवले भक्ष्य, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू

खेड : एम.ई.एस. ए.एम. परशुराम हॉस्पिटलमध्ये गुदरोगांवर लेझर उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा दाखल

banner 468x60

घाणेखुंट–लोटे (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील एम.ई.एस. ए.एम. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गुदद्वाराशी संबंधित आजारांवरील (Anorectal Diseases) उपचारांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत लेझर मशीन रुग्णसेवेसाठी दाखल करण्यात आले आहे.

या लेझर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मूळव्याध (Piles), भगंदर (Fistula), गुदफटी (Fissure), पायलोनिडल सायनस (Pilonidal Sinus) आदी गुदरोगांवर सुरक्षित, वेदनारहित व प्रभावी उपचार करता येणार आहेत. या पद्धतीमुळे कमी रक्तस्राव होतो, उपचारासाठी लागणारा कालावधी कमी असतो तसेच रुग्ण लवकर बरा होऊन दैनंदिन जीवनात परतू शकतो.

या नव्या सुविधेमुळे कोकणातील तसेच परिसरातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

स्थानिक पातळीवरच आधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *