Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

संगमेश्वर : साडेतीन लाखांचा ‘रॉक ब्रेकर’ घेऊन चालक पसार; तरुणावर गुन्हा दाखल

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील भिरकोड येथे पोकलेन मशीनवर चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकाचा विश्वासघात करून साडेतीन लाख रुपये किमतीचा ‘रॉक ब्रेकर’ लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात बिहारमधील संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय नामदेव नाळे (वय ४८) यांचा पोकलेन मशिनरीचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या मालकीचे पोकलेन मशीन (सिरीयल नं. २७५२८७१) आणि ओरियन कंपनीचा रॉक ब्रेकर (एल २२० मॉडेल, सिरीयल नं. ०८१-७५७५) चालवण्यासाठी आरोपी विकास कुमार महतो (रा. रामचंद्रपूर, जि. गोपालगंज, राज्य बिहार) याला चालक म्हणून नोकरीवर ठेवले होते.


​२० मार्च रोजी सायंकाळी ६ ते २१ मार्च सकाळी १० वाजेच्या दरम्यान, भिरकोड (ता. संगमेश्वर) येथील रस्त्यावर काम सुरू असताना, आरोपीने मालकाने विश्वासाने दिलेल्या मशीनसोबतचा ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा रॉक ब्रेकर चोरण्याच्या उद्देशाने त्याची विल्हेवाट लावली आणि तो तिथून परागंदा झाला.
मशिनचा महत्त्वाचा भाग आणि चालक बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर संजय नाळे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ३० मार्च रोजी रात्री ११ वाजता आरोपी विकास कुमार महतो याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६(४) अंतर्गत विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *