तळोजा येथून 17 वर्षीय विद्यार्थी सैफ निसार शिरगावकर बेपत्ता, कुटुंबीयांची नागरिकांना मदतीची आर्त हाक, मूळचा दापोलीचा

banner 468x60

नवी मुंबईतील तळोजा फेज-2 परिसरात राहणारा 17 वर्षीय विद्यार्थी सैफ निसार शिरगावकर हा 20 जुलै रोजी रात्री सुमारे 8 वाजता राहत्या घरातून बाहेर पडला असून, त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नाही. घटनेनंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रमंडळी व परिचितांकडे चौकशी करून त्याचा शोध घेतला; मात्र त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

banner 728x90

सैफ हा शिक्षणासाठी अरकान अॅव्हेन्यू, सेक्टर 24, तळोजा फेज-2, प्लॉट क्रमांक 12 येथे राहत होता. तो मूळचा इरफानी मोहल्ला, अडखळ, ता. दापोली येथील रहिवासी असून, उच्च शिक्षणासाठी सध्या तळोजा येथे वास्तव्यास आहे.

सैफ घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचा मोबाईल बंद असल्याचे किंवा त्याच्याशी संपर्क होत नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी त्याचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले असून, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

सैफ कुठेही दिसल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती लपवून न ठेवता तात्काळ त्याच्या कुटुंबीयांना किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळेवर मिळालेली छोटीशी माहितीही त्याचा शोध घेण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, असे कुटुंबीयांनी नमूद केले आहे.

संपर्क क्रमांक :
📞 96230 90515
📞 74986 83781
📞 81042 19821
📞 72185 99943

नागरिकांनी ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून सैफचा शोध घेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *