Breaking News
रत्नागिरी : पाली मराठवाडीत भरदिवसा घरफोडी, 6 लाख 8 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास दापोली : तीन दशकांच्या प्रबोधनात्मक लेखनाचा गौरव ! ज्येष्ठ लेखक माधव गव्हाणकर यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर परिवारातर्फे एक लाख रुपयांचा सन्मान, माधव गव्हाणकर यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल चिपळूण : तालुक्यातील खडपोली मोहल्ला नंबर 1 मध्ये विजेचा प्रश्न गंभीर; दोन वर्षांपासून थ्री-फेज वीजलाईनची प्रतीक्षा, महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न कायम रत्नागिरी : व्हॉट्सॲप पोस्टचा राग; रत्नागिरी एमआयडीसीत दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण, ‘पंचक्रोशी समाचार’ ग्रुपवरील पोस्टवरून वाद, कंपनीत घुसून मारहाण केल्याप्रकरणी चौघांसह अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल दापोली : आझाद मैदानात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तिघांविरोधात गुन्हे दाखल

रत्नागिरी : व्हॉट्सॲप पोस्टचा राग; रत्नागिरी एमआयडीसीत दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण, ‘पंचक्रोशी समाचार’ ग्रुपवरील पोस्टवरून वाद, कंपनीत घुसून मारहाण केल्याप्रकरणी चौघांसह अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टचा राग मनात धरून रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी परिसरात एका दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांसह एका अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, नाचणे येथील शांतीनगरमधील नवलाई संकुलात राहणारे श्रीकृष्णा देविदास शिर्सेकर (वय ४३) हे कर्णबधीर असून त्यांना दृष्टीदोषही आहे. ते मिरजोळे एमआयडीसीतील ‘स्टील आर्ट इंडस्ट्रीज’ (डी-१२) येथे नोकरी करतात. त्यांनी समाजमाध्यमावरील ‘पंचक्रोशी समाचार’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टवरून संशयित आरोपी आणि त्यांच्यात वाद निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याच वादातून बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास संशयितांनी कंपनीच्या गेटमधून आत प्रवेश केला. त्यानंतर शिर्सेकर यांना शिवीगाळ करत हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांच्या चष्म्याचे नुकसान झाले असून ते जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी सिद्धी विनायक शिर्सेकर, साक्षी शशांक शिरवडकर, शशांक विजय शिरवडकर, राहुल जगदीश करगुटकर (सर्व रा. जैतापूर, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १८९(२), १९१(२), ११५(२), ३२४(२) तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९२(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

सोशल मीडियावरील पोस्टवरून निर्माण झालेला वाद प्रत्यक्ष मारहाणीपर्यंत पोहोचल्याने या घटनेची चर्चा सुरू आहे. मात्र, प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *