Breaking News
दापोली : स्वयं-सहाय्यता बचत गटांतील महिला होणार उद्योजिका, ‘कृषी संगिनी’ समूहाकडून यशस्वी मार्गदर्शन खेड : लोटे एमआयडीसीत रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ संतप्त, संबंधित कारखान्यावर कठोर कारवाईची मागणी दापोली : शिवाजीनगर-भौंजाळी जिल्हा परिषद शाळेला ‘आदर्श शाळा पुरस्कार’; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव दापोली : साखळोली नं. 2 येथे कृषी संगिनींचा पुढाकार; ग्रामस्थांच्या सहभागातून तयार केला गावाचा सर्वसमावेशक नकाशा गुहागर : मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्याकडून जानवळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

रत्नागिरी : शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

banner 468x60

रत्नागिरीतील एका शाळेमध्ये शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोप दिल्याची घटना आज सोमवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती.

banner 728x90

यानंतर संतप्त नागरिकांनी या शिक्षकाची वरात पोलीस ठाण्यात नेली. याप्रकरणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिक्षकाविरुद्ध विनयभंग व बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) नुसार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित शिक्षक हा शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत होता. 9 जानेवारी रोजी शिक्षकाने शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीला मिठी मारल़ी तसेच तिच्याशी अश्लिल संभाषण केले. या प्रकाराने घाबरलेल्या पीडित मुलीने सर्व हकिगत पालकांना सांगितली.

या प्रकाराची शाळा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत शाळेचे संस्था चालक देखील घटनास्थळी दाखल झाले. शाळेत असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे सांगत त्या शिक्षकाचे तात्काळ निलंबन करण्यात येत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *