रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलाराज, खुल्या प्रवर्गामुळे चिपळूण, दापोलीत चुरस, जिल्ह्यात 9 नगराध्यक्षपदांपैकी 7 महिला अध्यक्ष!

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलाराज असून रत्नागिरी जिल्ह्यात 9 नगराध्यक्षपदांपैकी 7 महिला अध्यक्ष राहणार आहेत.

अध्यक्ष आणि सभापती पदांचे आरक्षण जाहीर झाले आहे.
सोमवारी मंत्रालयात झालेल्या सोडतीनंतर जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींच्या आरक्षणाचा निकाल समोर आला आहे.

महिलांसाठी आरक्षित नगर परिषद व नगरपंचायती:
रत्नागिरी, राजापूर, खेड (नगरपरिषद) तसेच गुहागर, देवरुख, लांजा, मंडणगड (नगरपंचायती) या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.

खुल्या प्रवर्गातील ठिकाणे:
चिपळूण नगर परिषद आणि दापोली नगर पंचायत खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत.

रत्नागिरी नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांना धक्का बसला आहे. शिंदे गटाचे वर्चस्व असले तरी भारतीय जनता पक्षही या स्पर्धेत उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजापूर, खेड आणि इतर नगरपंचायतींमध्ये महिला उमेदवारांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.

सर्वाधिक चुरस चिपळूणमध्ये अपेक्षित आहे, कारण ते खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे.
तर दापोली नगरपंचायतीतही खुल्या प्रवर्गामुळे स्पर्धा रंगणार आहे.
जिल्ह्यातील ९ नगराध्यक्षपदांपैकी तब्बल ७ ठिकाणी महिलाराज पाहायला मिळणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *