Breaking News
चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ लांजा : हर्चे शाखा डाकघरात 8.20 लाखांचा अपहार, तत्कालीन शाखा डाकपालाविरोधात गुन्हा

रत्नागिरी : जिल्ह्यातील चारशे कंत्राटी शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे

banner 468x60

कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णयाचा पुनर्विचार करून हा शासन निर्णय पुनर्जीवीत करावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील 400 कंत्राटी शिक्षकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले.

banner 728x90

यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये कंत्राटी तत्त्वावरती 672 शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केली होती. या जिल्ह्यामध्ये शाळा उघडण्यासाठी शिक्षक उपलब्ध नव्हते अनेक शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या होत्या त्यामुळे येथील शैक्षणिक व्यवस्था बिघडली होती ही शैक्षणिक परिस्थिती टिकवण्याचे काम स्थानिक डी.एड., बीएड.धारक आणि पदवीधर शिक्षक यांनी केले होते.

ते शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले.
सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षात 23 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 495 शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या. शासनाने 10 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या शासन निर्णयाप्रमाणे या सर्व शिक्षकांच्या नोकर्‍या धोक्यात आलेल्या आहेत.

हे सर्व शिक्षक बेरोजगार होणार आहेत. ज्या शिक्षकांनी रत्नागिरी जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्था वाचवली अशा शिक्षकांवर उपासमारीची वेळ येत असल्याकारणाने रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुदर्शन मोहिते, अजिंक्य पावसकर, संजय कुळये, गिरीष जाधव, रुपेश झोरे, मृदुला देसाई, विनोद कांबळे, अमोल सावर्डेकर, रुपाली वाघे, सुशांत मुंडेकर, योगेश कांबळे, श्रेया कापसे, आरती तांबे, प्रिया गमरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *