रत्नागिरी : जिल्ह्यातील 15 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह सोमवारी जाहीर झाले. पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

banner 728x90

यामध्ये प्रवर्ग-१० यामध्ये विशेष सेवा करणारे रत्नागिरी पोलिस मुख्यालयातील पोलिस हवालदार नितीन डोळस यांचा समावेश आहे तर प्रवर्ग-८ म्हणजे १५ वर्षे सेवा केल्याप्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे सहाय्यक पोलिस फौजदार सुधाकर रहाटे, महामार्ग पोलिस मदत केंद्र हातखंबाचे सहाय्यक पोलिस फौजदार संजय मुरकर, देवरुख पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस

फौजदार दिपक पवार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत, रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार दिनेश आखाडे, महामार्ग पोलिस मदत केंद्र कशेडीचे पोलिस हवालदार विजय मोरे, पूर्णगड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रकाश मोरे, व

महिला पोलिस हवालदार सोनाली शिंदे, अलोरे पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार दिपक ओतारी, जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार मिलिंद कदम, चिपळूण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रितेश शिंदे, दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संतोष सडकर, पूर्णगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार महेश सावंत यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *