रत्नागिरी : हातखंबा-निवळी बावनदी उतारावर दुचाकी घसरून अपघात; 52 वर्षीय व्यक्ती जखमी

banner 468x60

: मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा नजीक निवळी-बावनदी उतार येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली. हा अपघात शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय गोविंद रांबाडे (वय ५२, रा. वांगणी, ता. संगमेश्वर) हे दुचाकी क्रमांक MH 08 AH 5010 वरून रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जात होते. निवळी-बावनदी उतार परिसरात त्यांची दुचाकी अचानक घसरल्याने ते रस्त्यावर पडून जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थेची हातखंबा येथे २४ तास कार्यरत असलेली मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका पथकाने जखमी धनंजय रांबाडे यांना प्राथमिक मदत देऊन पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले.

वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने जखमीला तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत झाली. अपघाताबाबत पुढील कार्यवाही संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *