रत्नागिरी: 33 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील एकतानगर परिसरात ४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्यापूर्वी एका ३३ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी पंख्याला नायलॉन साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नम्रता बाळासाहेब अकिवटे (वय ३३, रा. एकतानगर, खेडशी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात ‘अमृ. क्र. ९८/२०२५’ प्रमाणे ‘बी.एन.एस.एस १९४’ अन्वये करण्यात आली आहे. सदर आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


प्राप्त माहितीनुसार, नम्रता अकिवटे यांनी खेडशी येथील त्यांच्या घरी सिलिंग फॅनला नायलॉनची साडी बांधली आणि तिचा फास गळ्यात अडकवून गळफास घेतला. ही घटना सायंकाळी ५.१५ च्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. अकिवटे यांच्या आत्महत्येमुळे एकतानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *