Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेत ‘रोशन मोहल्ला’ येथे रानरेड्याचं दर्शन

banner 468x60

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ परिसरात 26 नोव्हेंबर सकाळी रोशन मोहल्ला येथे अचानक एक रानरेडा दिसून येताच परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी बाजारपेठेत भरणाऱ्या गर्दीदरम्यान रानरेड्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.


स्थानिकांच्या माहितीप्रमाणे, रानरेडा जवळील झाडीच्या भागातून रस्त्याकडे आला. काही क्षण तो रस्त्यावरच थांबला आणि नंतर पुन्हा बाजूच्या पडीक भागात निघून गेला. सुदैवाने या दरम्यान कुठलीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची नोंद नाही.


नागरिकांनी रानरेड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे घटना झपाट्याने पसरली.

वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की रानरेडा किंवा कोणतेही वन्यप्राणी दिसल्यास त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे, प्राण्याला चिडवू नये किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये,तत्काळ वनविभागाला किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी.


या घटनेमुळे पुन्हा एकदा परिसरात वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याच्या वाढत्या घटनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *