रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर व परिसरात ९ जुलै २०२६ रोजी चिपळूण पोलिसांनी जुगार आणि बेकायदेशीर दारूविक्रीविरोधात स्वतंत्र कारवाया करत तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत रोख रक्कम, जुगार साहित्य तसेच गावठी व देशी दारू जप्त करण्यात आली.
पहिल्या कारवाईत भेंडीनाका येथील फ्रेश चिकन शॉपच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडजवळ शुभ अंकावर पैसे लावून मुंबई मटका जुगार चालविणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी पोलीस हवालदार वृशाल सगुण शेटकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक २०६/२०२६ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये दाखल करण्यात आला आहे. आरोपी अक्षय बारक खेडेकर (वय ४३, रा. कामथे, माटेवाडी, ता. चिपळूण) याच्याकडून ६२० रुपये रोख रक्कम व इतर जुगार साहित्य असा एकूण ६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत मौजे गुढे, गणेशवाडी येथे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी राजेंद्र शांताराम मोरे (वय ५२, रा. गुढे, गणेशवाडी, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २०७/२०२६ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये दाखल करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल राकेश मनोहर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसऱ्या कारवाईत भोम येथील आदवडेवाडी, कातळपाडा परिसरात उघड्यावर देशी दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी यशवंत राजाराम साळंखे (वय ६८, रा. भोम लालबाग, ता. चिपळूण) याच्यावर गुन्हा क्रमांक २०८/२०२६ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार महेश हरिश्चंद्र चिले यांच्या फिर्यादीवरून करण्यात आलेल्या या कारवाईत १८० मिलीच्या टॅंगो देशी दारूच्या १० बाटल्या, सुमारे ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चिपळूण पोलिसांनी जुगार व बेकायदेशीर दारूविक्रीविरोधातील कारवाया अधिक तीव्र केल्या असून अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













