खेडमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, एकाच परिसरात 5 गुन्हे दाखल

banner 468x60

खेड नगरपरिषदेच्या स्मशानभूमीजवळील भोस्ते पुल परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांविरोधात खेड पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई ६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित श्रीकांत जाधव (वय २७, रा. सुशेरी नं. १, साठेवाडी, ता. खेड) याच्याविरोधात गु.र.नं. २९०/२०२६ दाखल करण्यात आला. तो रात्री सुमारे ९.३५ वाजता भोस्ते पुलाजवळील स्मशानभूमी परिसरात दारू पिताना आढळून आला.

त्यानंतर सचिन लक्ष्मण कासार (वय ३०, रा. तिनबत्ती, पावसकर नाका, ता. खेड) याच्याविरोधात गु.र.नं. २९१/२०२६ दाखल करण्यात आला. तो रात्री सुमारे ९.२० वाजता सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळून आला.

याचप्रकरणी निखिल नरेश पोफळकर (वय २३, रा. साठेवाडी, सुसेरी नं. १, बहिरवली फाटा, ता. खेड) याच्याविरोधात गु.र.नं. २९२/२०२६ दाखल करण्यात आला. तो रात्री सुमारे ९.१५ वाजता स्मशानभूमीजवळ मद्यपान करताना पोलिसांना आढळला.

तसेच नितेश तानाजी शेडगे (वय ३२, रा. समर्थ अपार्टमेंट, पाटीदार समोर, समार भरणे, ता. खेड) याच्याविरोधात गु.र.नं. २९३/२०२६ दाखल करण्यात आला. त्याच्यावरही सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना दारू सेवन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

तर ओंकार सूर्यकांत पोयनार गोरीवले (वय २२, रा. मानेवाडी, ता. खेड) याच्याविरोधात गु.र.नं. २९४/२०२६ दाखल करण्यात आला. तो रात्री सुमारे ९.३० वाजता भोस्ते पुलाजवळील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळून आला.

या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना ते सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना रंगेहात आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पाचही गुन्हे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असून, खेड पोलिसांच्या या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *