Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

गुहागर : गेल्या दोन दिवसांपासून आई-मुलगी बेपत्ता

banner 468x60

गुहागर तालुक्यातील पडवे खतीब मोहल्ला येथील खादिजाबी मुस्तकीम हरणेकर (वय 26) आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी हानिया मुस्तकीम हरणेकर या दोघी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असून, त्यांच्या शोधासाठी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खादिजाबी या आपल्या लहान मुलीसह घराबाहेर गेल्यानंतर त्या दोघी परत आल्या नाहीत. या दोघींना शेवटचे रत्नागिरी येथील आठवडा बाजार परिसरात पाहिल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. त्यानंतर मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

परिसरातील लोकांमध्ये या घटनेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईकांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर खादिजाबी आणि हानिया हरणेकर यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास मोबाईल क्रमांक 8698214184 किंवा 7756011672 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *