केरळमध्ये पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता

banner 468x60

भारतीय हवामान विभागाने (IMD) नैऋत्य मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाचा वेग काहीसा मंदावल्याने केरळमध्ये त्याचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिराने होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

banner 728x90


IMD च्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील नैऋत्य व आग्नेय भाग, लक्षद्वीप परिसर तसेच केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरातील पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य भागांतही मान्सूनचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने यापूर्वी मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

मात्र, वातावरणातील बदल, कमकुवत वारे आणि आवश्यक पर्जन्यमानाचा अभाव यामुळे मान्सूनच्या आगमनाला विलंब झाला. आता जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये प्री-मान्सून पावसाची नोंद होत असून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. राजस्थानमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली असून मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातही अनेक भागांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत.


मान्सूनच्या उशिरामुळे खरीप हंगामाच्या तयारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, हवामान विभाग आणि राज्य सरकारकडून पेरणीबाबत घाई न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *