Breaking News
सिंधुदुर्गातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या, उन्हाच्या तीव्रतेमुळे वैभव नाईकांची मागणी, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा; शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लांजा : 27 वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू, गळफास घेण्याचा केला होता प्रयत्न ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, आमदार शेखर निकम यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली संगमेश्वर : देवरुख सुवर्णकार अपहरण-दरोडा प्रकरण- वर्षभर फरार चार आरोपी जेरबंद, चार आरोपींना कल्याण, नवी मुंबई आणि बारामतीतून अटक, गुन्ह्यातील अर्टिगा कारही जप्त ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, आमदार शेखर निकम यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

banner 468x60

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांचे गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी त्यांना गंभीर स्वरूपाचा कार्डियाक अरेस्ट आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांना वाचवता आले नाही.

नाना पाटेकर यांच्या निधनावर चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवानिमित्त नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी भेट झाली होती. यावेळी नाना पाटेकर यांनी अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले होते. समाजकारण, ग्रामीण भागातील प्रश्न तसेच चिपळूण परिसरातील सामाजिक घडामोडींवर त्यांच्याशी मनमोकळा संवाद झाल्याची आठवण आमदार निकम यांनी सांगितली.

“नाना हे केवळ महान अभिनेते नव्हते, तर समाजासाठी झटणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. अगदी गळ्यात हात टाकून प्रेमाने विचारपूस करणारा हा माणूस आज आपल्यात नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच मन अत्यंत व्याकूळ झाले. समाजासाठी आणि राष्ट्रासाठी जगणारा हा अभिनेता अचानक निघून जाईल, असे कधीच वाटले नव्हते,” अशा भावना आमदार निकम यांनी व्यक्त केल्या.

नाना पाटेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि संकटग्रस्त कुटुंबांसाठी केलेले कार्य समाज कायम स्मरणात ठेवेल, असेही आमदार निकम यांनी नमूद केले. विशेषतः चिपळूणमध्ये आलेल्या महापुरानंतर पुनर्वसन, पूरमुक्ती आणि गाळमुक्तीच्या कामांमध्ये नाना पाटेकर यांनी दिलेले योगदान आणि पाठबळ अत्यंत मोलाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.

दमदार अभिनय, प्रभावी संवादफेक आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.

“नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. आपण एक ज्येष्ठ मार्गदर्शक, सच्चा मित्र आणि समाजासाठी झटणारा माणूस गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशा शब्दांत आमदार शेखर निकम यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *